आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीच्या दोन महिन्यांत पाच परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांसाठी येत्या दोन महिन्यांत पाच परीक्षा होणार आहेत. त्यामुळे जून आणि जुलै हे दोन्ही महिने स्पर्धा परीक्षांचेच होतील. राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदांसाठी ही भरती मोहीम आहे. पदवीधरांसाठी ही एक चांगली संधी आहे.
आयोगाकडून घेण्यात येणार्‍या या परीक्षा राज्यभर होतील. सोलापूरही परीक्षा केंद्र आहे. त्याचे वेळापत्रक आयोगाने आयोगाचे उपसचिव एस. एस. पाठक यांनी जाहीर केले. काही परीक्षांचे प्रवेशपत्र उमेदवारांना ऑनलाइनने पाठवल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या परीक्षेसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून सुमारे 7 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे.
परीक्षांचे वेळापत्रक

16 जून : अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त
29 जून : संशोधन अधिकारी, अधीक्षक उच्च व तंत्र शिक्षण, वन सांख्यिकी, सहायक वन सांख्यिकी
20 जुलै : अन्न व औषध प्रशासन विभागातील प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा
प्रवेशपत्र नसेल तर..
आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी प्रवेशपत्रे पाठवली होती. परंतु ज्यांना मिळाली नाहीत, त्यांना पॅनकार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणताही पुरावा सादर करून परीक्षेस बसण्याची मुभा देण्यात आली होती. हा संदर्भ लक्षात घेऊन उमेदवारांनी पुरावा सिद्ध करणारी कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी कळवले.
वाचनालयात सोय
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या वेळात तिथेच बसून अभ्यास करता येईल. सामान्यज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आदींची पुस्तकेही या दालनात उपलब्ध करून देण्यात आली. उमेदवारांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह यल्लप्पा ताटीपामूल यांनी केले आहे.