आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरतील अवघ्या आठ वर्षांचा ईशान एमएस-सीआयटीत टॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सेंट जोसेफ हायस्कूलमधील तिसरी इयत्तेतील इशान प्रसन्न खटावकर या अवघ्या आठ वर्षांच्या मुलाने शासनाचा एमएस-सीआयटी संगणकीय अभ्यासक्रम प्रशिक्षण अश्वत्थ इन्स्टिट्यूटमधून यशस्वीरीत्या पूर्ण केला असून 100 पैकी 95 गुण मिळवून तो टॉप राहिला.

ईशान हा येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर यांचा मुलगा आहे. राज्यातून तो सर्वात लहान वयाचा परीक्षार्थी होता. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासून इशान संगणक शिकत होता. अश्वत्थचे रोहित जेऊरकर, प्रा. काशिनाथ यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.

मुलाच्या यशात त्यांच्या मार्गदर्शनाचा वाटा मोलाचा आहे, असे डॉ. खटावकर म्हणाले. उन्हाळय़ाच्या सुटीचा उपयोग करून ईशानने एमएस सीआयटी अभ्यासक्रम पूर्ण केला. यशस्वीपणे परीक्षाही दिली. याची काठिण्य पातळी बहुतांशजणांनी अनुभवली आहेच, या पार्श्वभूमीवर वयाने लहान असूनही ईशानने संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करणे ही कौतुकाचीच बाब आहे. लहान मुले अगदी अल्पकाळात संगणक लीलया हाताळू शकतात, संगणकाची कार्यशैली अल्पावधीत समजावून घेऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरू शकते. लहान वयात मिळालेल्या यशाबद्दल ईशानचे कौतुक होत आहे. महाराष्ट्रात सर्वात लहान वयात एमएस-सीआयटी पूर्ण केल्याचा दावा त्याचे वडील डॉ. खटावकर यांनी केला.