आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा झटका : सुमारे २० टक्के दरवाढीचा नियामक आयोगाचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महावितरणने एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ मध्ये वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगासमोर प्रस्ताव मांडला आहे. यावर येत्या १० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रस्तावानुसार साधारण २० ते २२ टक्के वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे.
वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी वीज ग्राहक औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने कृती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली. राज्य सरकारने डिसेंबर २०१४ पासून दरमहाचे अनुदान बंद केल्यामुळे ही वाढ झालेली आहे. याच्या विरोधात समितीने आंदोलन पुकारले आहे.
सोलापूर शहराचे वीजग्राहक असे

घरगुती: १० लाख ५२ हजार
व्यावसायिक : २० लाख ९९४
औद्योगिक : हजार ४९१
इतर : १६००

वीज वापराचे समीकरण

शून्यते ७५ युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांची नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे. तर ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्या आणि १२६ ते ३०० युनिट वापरणाऱ्या वीज ग्राहकांची स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आली आहे.

त्यानंतरच्या आंदोलनाचे टप्पे
राज्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय महावितरण जिल्हा कार्यालय, शक्य तेथील महावितरण कार्यालय, तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा, याचवेळी प्रमुख चौकात वीज बिलांची होळी, राज्य शासन आणि महावितरण कंपनीला निवेदन, २७ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ११ वाजता वीज बिलांची होळी, यानंतर आंदोलन तीव्र, महाविरतणने केलेले विविध आदेश भंग, दरवाढ याचिका दाखल,
अनुदान बंद केल्याने पेच
^सरकारने अनुदान देणे बंद केल्यामुळे वीज ग्राहकांवर भार पडला. यानंतर पुन्हा महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव आणल्याने दुहेरी भार ग्राहकांवर पडणार आहे. एकंदर २० ते २२ टक्के वीज दरवाढ होईल. दरवाढ रद्द हाेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल.” प्रतापहोगाडे, अध्यक्ष, राज्य वीज ग्राहक संघटना

दरवाढीला विरोध
^वीज दरवाढीला विरोध आहे. या दरवाढीमुळे उद्योग अडचणीत येईल. याच्या विरोधात येत्या आठवड्यात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल.” पेंटप्पागड्डम, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर