आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन समितीच्या बससेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात येणार असून शहरातील तीन हजार विद्यार्थी व इतर एक हजार प्रवासी अशा चार हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या सेवेअंतर्गत दरमहा रिचार्ज करण्याची सोय आहे. कार्डासाठी 25 रुपये खर्च येणार आहे. ही सेवा आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ट्रायमेक्स कंपनीस मक्ता देण्यात आला आहे.

उत्पन्नात वाढ होईल
परिवहनचे उत्पन्न वाढले असून, बुथेलो कंपनीकडून 9 ऐवजी 15 बस मिळणार आहेत. चॉईस कंपनी 18 बस देणार आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डचा फायदा होणार आहे. ’’ ए. ए. पठाण, परिवहन व्यवस्थापक

आठ दिवसांत सेवा
स्मार्ट कार्ड योजना राबवण्यासाठी महापालिकेने ट्रायमेक्स कंपनीस मक्ता देण्यात आला असून, त्याची वर्कऑर्डर महापालिका परिवहन विभागाने दिली आहे. या उपक्रमातील स्मार्ट कार्डचे वितरण येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.

खर्च वाचणार
कार्ड काढल्यानंतर दरमहा रिचार्ज करावे लागेल. यापूर्वी पाससाठी पाच रुपयांप्रमाणे दरवर्षी 50 रुपये खर्च होता. आता 25 रुपये खर्च होणार आहे.

परिवहनचे उत्पन्न वाढले
परिवहनच्या उत्पन्नात या महिन्यात 22 लाखांनी वाढ झाली. अवैद्य रिक्षावरील कारवाई, तिकीट दरातील वाढ ही यामागील कारणे आहेत. उत्पन्नात वाढ झाल्याने या महिन्यात परिवहन कर्मचार्‍यांचा एक महिन्याचे वेतन देता येईल.