आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची टूर निघाली आता नेपाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराच्या वतीने 5 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कोलकाता, भुवनेश्वर,जगन्नाथपुरी, तसेच नेपाळ येथील काठमांडू, पशुपतीनाथ या ठिकाणी सहल जाणार आहे.

5 जानेवारी रोजी सोलापूर बसस्थानकातून सहल निघणार आहे. या मध्ये परळी वैजनाथ, माहुर, चित्रकुट, काशी, गोरखपूर, बुद्धगया, गंगासागर, कोलकाता, जगन्नाथपुरी, साक्षीगोपाळ, भुवनेश्वर, अनावरण, कोणार्क, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी प्रमुख शहरांना भेटी देण्यात येणार आहे. या सहलीचा प्रती व्यक्तीसाठी 12 हजार 500 रुपये असा खर्च असून. सहलीत चहा, नाष्टा, भोजन व निवासाची सोय एसटी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रभाकर माशाळे (9850882120) अथवा ताराचंद राठोड (9960736732 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.