आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडेवार यांनी थांबवलेल्या मक्तेदाराला पुन्हा काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील २३४ कोटींच्या ३८ रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण केल्याने तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थांबवलेल्या मक्तेदाराला पुन्हा काम देण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीत घेण्यात आला. पुन्हा टेंडर काढल्यास पालिकेचे ५० कोटी रुपये वाचतील, असे गुडेवार यांनी सांगितले होते. परंतु शुक्रवारी स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाने संशय िनर्माण झाला आहे. यामागे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता स्थायी समिती सदस्य आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.
नगरोत्थान योजनेतून २३४ कोटींची कामे पुण्याच्या युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू होती. त्यापैकी ११ रस्ते वगळता अन्य कामे थांबवली होती आणि त्या कामाच्या पुन्हा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन कामांचा २७.२८ कोटींचा मक्ता एस. एम. अवताडे यांना देण्याचा प्रस्ताव स्थायीत समोर होता. परंतु दरामध्ये तफावत असल्याचे सांगत ही कामे पुन्हा युनिटीलाच देण्याचा ठराव शुक्रवारी स्थायीत बहुमताने करण्यात आला.

युनिटीने वेळेत कामे पूर्ण केले नाहीत. पालिकेकडून जागेचे भूसंपादन झाले नाही म्हणून ते काम पुढे त्याच मक्तेदारांना दिल्यास त्यांना वाढीव दर द्यावे लागत होते. त्यामुळे मनपाचे संभाव्य आर्थिक नुकसान पाहता पुढील कामे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थांबवली होती.
टागाड्या घेण्याचा विषय फेरसादर
७०घंटागाड्या घेण्यासाठी अत्यावश्यक बाबीअंतर्गत १.६८ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव माहिस्तव स्थायी समितीपुढे आले असता, यात मुख्य लेखापरीक्षकांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यांची पूर्तता करा असे म्हणून सदरचा विषय फेरसादर करण्याचा आदेश सभापती बाबा मिस्त्री यांनी दिला. समीक्षाचा मक्ता रद्द केला नसताना घंटागाड्या घेतल्या कशा, आदी प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत.
२८ कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव
अन्यकामांपैकी अॅम्बेसिडर हाॅटेल ते आडवा नळ ते शरदचंद्र पवार प्रशाला ते अरविंद धाम, जुना विजापूर नाका ते मोदी रेल्वे भुयारी मार्ग, तुळजापूर वेस ते कांेतम चौक, मुळेगाव रोड ते केकडे नगर, औद्योगिक केंद्र ते होटगी रोड अशी २८ कोटी २८ लाख ९५ हजार ९५३ रुपयांची कामे एस. एम. अवताडे यांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समोर होता. ताे फेटाळून युनिटीला कामे देण्याचा प्रस्ताव बहुमताने मान्य करण्यात आला.
युनिटीला काम द्या
यापूर्वीस्थायी सभागृहात युनिटीला काम दिले होते. त्यांचा मक्ता रद्द करता दुसऱ्यांना काम देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी आणला. युनिटीच्या दराने काम दिल्यास मनपाचे २५ लाख वाचणार आहेत. त्यामुळे युनिटीला काम देण्याचा प्रस्ताव बहुमताने मान्य करण्यात आला. बाबामिस्त्री, स्थायी समिती सभापती
सविस्तर चर्चा नाही
स्थायीत सविस्तर चर्चा झाली नाही. पण प्रसिद्धी माध्यमांना खोटेच सांगण्यात आले. स्थायीनेच आयुक्तांना अधिकार दिला होता. युनिटीने काम केले नाही म्हणून आयुक्तांनी थांबवले. गुडेवारांच्या बदनामीचा कट आहे. अर्थपूर्ण व्यवहार होण्याची शक्यता आहे. आनंदचंदनशिवे, स्थायी सदस्य
अडकणार नाही
मुख्यलेखापरीक्षकांचे आक्षेप असताना मंजुरी कशी द्यायची, यात आम्ही अडकणार नाही. घंटागाड्या घेण्यासाठी स्थायीची मान्यता घेतली नाही. मान्यता घेता एक कोटी रक्कम मक्तेदारांना दिली. घंटागाड्याच्या विषय फेरसादर करण्यास सांगितले. चेतननरोटे, स्थायी समिती सदस्य