आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनाच्या चिंतेमुळे महापालिका कोंडीत, आयुक्तांचे रूजू होणे लांबणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गाळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाली. त्यांनी तडकाफडकी पदभार सोडला. नवे आयुक्त शेखर गायकवाड ठाणे झेडपीतून रिलिव्ह झाले, परंतु सोलापुरात रूजू होण्यास त्यांनी तूर्त नकार दिला आहे. दुसरीकडे मनपाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कर्मचारी वेतनाचा प्रश्न सतावतो आहे. यामुळे मनपाची स्थिती कोंडीत सापडल्यागत झाली आहे. गाळे भाडेप्रश्नावर मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीकडे व्यापारीवर्गाचा डोळा लागला आहे.
एस्कॉर्ट बंद झाल्याने मनपा उत्पन्नाचा महत्त्वाचा मार्ग कमी झाला. मनपाच्या तिजोरीत सोमवारपर्यंत दोन कोटी शिल्लक होते. आगामी दोन दिवसात तीन कोटी रुपये वीज बील भरणा करावा लागणार आहे. कर्मचारी वेतनासाठी चार कोटी आवश्यक आहेत. उत्पन्न वाढवण्यासाठी टॅक्स एलबीटी वसुलीवर भर दिला. नवे आयुक्त रूजू होईपर्यंत वसुलीवर प्रभाव दिसून येईल.
जिल्हाधिका-यांकडे पदभार द्या-
नवेआयुक्त येण्यास विलंब होत असेल तर तात्पुरता पदभार जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेे यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे फॅक्सद्वारे केली.
गाळे लिलाव प्रक्रिया सुरूच
गाळेलिलावाची प्रक्रिया मनपाने सध्या तरी चालूच ठेवली आहे. राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीस अप्पर आयुक्त विलास ढगे, भूमी मालमत्ता अधीक्षक सािरका आकुलवार उपस्थित राहणार आहेत. गाळे लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी संघर्ष समितीची आहे. याबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना रविवारी निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक मुळीक, राज्ू राठी, नागेश वल्याळ उपस्थित होते.
गुडेवार यांनी घेतली याचिका मागे
माजीआयुक्त चंद्रकांत गुडेवार शनिवारी मुंबई ग्रामविकास खात्यात रूजू झाले. त्यांनी यापूर्वी बदली विरोधात दाखल याचिका मागे घेण्यासाठी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला. त्यामुळे न्यायालयातील प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे.
गायकवाडयांना पदभारास विलंब
सोलापूरमहापालिकेचे नवे आयुक्त शेखर गायकवाड हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी शनिवारी ठाणे जिल्हा परिषदेचा पदभार सोडला. परंतु, तूर्तास सोलापूर महापालिकेचा पदभार घेण्यास ते इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले. सात दिवसांनंतर शासन पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्त नसल्याने निर्णयप्रक्रिया रखडणार आहे.
सात दिवसांनंतर पदभाराचा निर्णय
मी ठाण्याचा पदभार सोडला आहे. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी असतो. सात दिवसांनंतर पाहू. चंद्रशेखर गायकवाड, नवे आयुक्त