आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तही करणार मालमत्ता जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कर्मचार्‍यांच्या मालमत्तांचे विवरणपत्र घेणार्‍या महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरणपत्र जाहीर करण्याची घोषणा केली. एक ऑक्टोबर 2013 रोजी संकेतस्थळावर विवरणपत्र जाहीर करू. पदाधिकार्‍यांच्या मालमत्ता निवडणुकीपूर्वीच घेतल्या जात असतील तर कर्मचारी-अधिकार्‍यांनीही पारदर्शी असले आणि दिसले पाहिजे, असे र्शी. गुडेवार म्हणाले.

नगरसेवकांची मालमत्ताही येणार संकेतस्थळावर
महापालिका निवडणूक लढवताना नगरसेवकांनी मालमत्ता विवरणपत्र दिलेले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ते टाकण्यात येईल. त्यामुळे नगरसेवकांची मालमत्ता नागरिकांना दिसेल. महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मालमत्तेचे विवरणपत्र दिले आहे. ती माहिती नागरिकांसाठी लवकरच संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार आहे.

मनपाच्या गाड्यांवर नजर
महापालिकेतील अनेक अधिकार्‍यांकडे दोन पदांचा भार आहे. या अधिकार्‍यांकडे दोन विभागाची वाहने आणि अन्य सुविधाही आहेत. अतिरिक्त वाहनांची गरज नसताना ती वापरली जातात. ती जमा करावीत आणि इतर सहित्य असतील तर तेही जमा करावे, असा आदेश आयुक्त र्शी. गुडेवार यांनी सामान्य प्रशासनास दिला.

अतिरिक्त संपत्ती दाखवा
मी एक ऑक्टोबर रोजी माझी मालमत्ता महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. माझी अतिरिक्त संपत्ती कोणीही दाखवावी. माझी नेमणूक राज्य शासनाकडे आहे, राज्याकडे संपत्ती द्यावी असा नियम आहे, पण मी महापालिकेच्या बेवसाइटवर टाकणार आहे. चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त