आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी तुळजापूर रोड जकात नाक्याची पाहणी केली. दिवसभरात संकलित झालेल्या रकमेत 16 हजार 380 रुपयांची तफावत आढळल्यामुळे त्यांनी दोन कर्मचार्यांविरुद्ध जोडभावी पोलिस ठाण्यात साहाय्यक प्रशासन अधिकारी अजित खंदारे यांच्यामार्फत फिर्याद नोंदवली. यासाठी ते दोन तास पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
श्री. गुडेवार यांनी बुधवारी रात्री आठच्या सुमारास श्री. खंदारे यांना सोबत घेऊन जकात नाक्याची पाहणी केली. त्यावेळी कर्मचारी एस.आर. सरवदे व पंगुडवाले कामावर होते. चार वाजेपर्यंत जमा झालेल्या पावत्यांची त्यांनी पाहणी केली. पावतीप्रमाणे 1 लाख 36 हजार 790 रुपये संकलित होणे अपेक्षित असताना या हिशोबात 16 हजार 380 रुपयांची तफावत आढळून आली.
हिशेबातील तफावतीची रक्कम लिपिक बनसोडे यांनी सोबत नेली असल्याचे कर्मचारी एस.आर.सरवदे यांनी आयुक्त गुडेवार यांना सांगितले. बनसोडे यांनी श्री. खंदारे यांना दूरध्वनीवरून पैसे घेतल्याची कबुली दिली. या घटनेची फिर्याद खंदारे यांनी जोडभावी पोलिसात दिली. याप्रकरणी सरवदे व बनसोडे यांना पोलीस निरीक्षक काळुराम धांडेकर यांनी अटक केली आहे. रात्री दहाच्या सुमाराला बनसोडेला पोलिसांनी ठाण्यात आणले होते. त्यांनी मी सुटीवर आहे, पैसे कशाला घेऊ असे श्री. धांडेकर यांना सांगितले. अपहारीत रक्कम उशिरापर्यंत जप्प्त केली नव्हती. फिर्याद नोंदवून घेईपर्यंत मनपा आयुक्त गुडेवार पोलिस ठाण्यात ठाण मांडूनच बसलेले होते. फौजदार विक्रांत बोधे तपास करीत आहेत.
स्वच्छ प्रशासन राहील
जकात नाक्याची अचानक पाहणी केली. नाकेदाराकडे पावतीप्रमाणे संकलित रक्कम आढळून आली नाही. त्यामुळे संबधितांविरुध्द फौजदारी केली आहे. यापुढेही पारदश्री प्रशासन यंत्रणा अमलात आणण्याचा प्रयत्न राहील. -चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.