आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner Send Notice To MP Ravi Patil,

बांधकाम परवाना रद्द का करू नये; माजी आमदार रवी पाटलांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी न घेता सातरस्ता येथे टोलेजंग इमारत उभारण्यात येत असल्याने तो बांधकाम परवाना का रद्द करू नये? अशा आशयाची नोटीस इंडीचे माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील यांना 7 डिसेंबर 2013 रोजी महापालिकेने पाठवली होती. त्याचा पाटील यांनी केलेला खुलासाही नाकारत पुन्हा 3 मार्च रोजी त्यांना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नोटीस बजावली आहे.
रवी पाटील हे सातरस्ता येथे राष्ट्रय महामार्गास लागून व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभे करत आहेत. इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हे बांधकाम रस्त्यावर असल्याची शक्यता वाटल्याने पाटील यांना डिसेंबरमध्ये महापालिकेने नोटीस दिली. बांधकाम परवाना काढताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे काय? अशी विचारणा करण्यात आली होती. खुलासा सादर करताना महामार्ग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न जोडल्याने तो खुलासा महापालिकेने अमान्य केला.
बेकायदेशीर आणि व चुकीचे प्रकरण दाखल करून बांधकाम परवाना मिळवल्याने तो रद्द करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या नोटिसीत नमूद केले आहे. 31 मे 2013 चा बांधकाम परवाना आहे. अजूनही कागदपत्रे असतील तर महापालिकेस सादर करावीत, असे नोटिसीत नमूद केले आहे.
याबाबत जागामालक रविकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कायदेशीर नोटीस दिली
4सातरस्ता येथील रवी पाटील यांच्या बांधकामास नोटीस दिली. कायदेशीर नोटीस त्यांना पाठवून दिली आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त