आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissionr Khadare Dismiss Issue Solapur

साहाय्यक आयुक्त खंदारेंच्या निलंबनाचा ठराव मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चॉइस ट्रॅव्हल्स एजन्सीला बससेवा वाहतुकीचा मक्ता बेकायदेशीरपणे देऊन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी साहाय्यक आयुक्त अजित खंदारे यांना निलंबित करण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंगळवारी घेण्यात आला. महापालिका परिवहन सेवा एसटी महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

परिवहन विभागातील पास गैरव्यवहार, वारंवार होणार्‍या चोर्‍यांसंदर्भात खंदारे यांनी फौजदारी न करणे, निविदा प्रक्रियेत नसताना चॉइस ट्रॅव्हल्स एजन्सीला मक्ता देणे, बँकेकडून काढलेल्या कर्जास महापालिका जामीन देणे, या प्रकारांना खंदारे जबाबदार

असल्याने त्यांना निलंबित करावे आणि परिवहन सेवांमध्ये सुधारणांसाठी ती एसटी महामंडळाकडे वर्ग करावी, असा प्रस्ताव अँड. यू. एन. बेरिया आणि संजय हेमगड्डी यांनी मांडला होता.

चॉईस प्रकरणी चौकशीचे काय झाले, असा प्रश्न नागेश वल्याळ यांनी उपस्थित केला. परिवहन विभागाचे ‘ऑपरेशन’ करण्याची गरज असल्याचे मनोहर सपाटे म्हणाले. दरम्यान, बेरिया यांच्या प्रस्तावाचे सर्मथन करीत मनपा परिवहन सेवा एसटी महामंडळाकडे तत्काळ वर्ग करावी. त्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा असे सभागृह नेते महेश कोठे यांनी सांगितले. ठराव बहुमताने मंजूर झाला. खंदारे यांच्या निलंबनाच्या ठरावावर कोठे यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

‘बूस्ट’साठी 22 हजार खर्च !
परिवहन समितीचे सदस्य मल्लिनाथ बडगू आणि इतरांनी ‘बूस्ट’ पिण्यासाठी 22 हजार रुपये खर्च केले, असा आरोप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला. अँड. बेरिया यांनी या आरोपाचे खंडन केले.