आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation And Zp Member Fund Issue Solapur

मनपा अन् जि. प. सदस्यांमध्ये निधी मिळवण्यासाठी रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दलित वस्तींना रस्ते, पाणीपुरवठा व सभागृहासाठी निधी मिळत नाही, जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब आहेत. या रस्त्यांना 100 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली, तर दुसर्‍या बाजूला आमदार प्रणिती शिंदे, महापौरांसह नगरसेवकांनी शहरावर आजपर्यंत अन्याय होत आला आहे. शहर लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा, अशी आग्रही भूमिका घेतली. यावर पालकमंत्री दिलीप सोपल यांनी निधी देण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ, असे सूचक उत्तर देत आक्रमक सदस्यांना शांत केले.

पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेत नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत मनपा व जिल्हा परिषद सदस्य निधी मिळवण्यासाठी पहिल्यांदाच इतके आक्रमक दिसले. जि. प.चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती शिवाजी कांबळे, शिवानंद पाटील, संजय शिंदे, सुरेश हसापुरे यांनी ग्रामपंचायत विकासासाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील रस्ते आदी कामांसाठी निधीची मागणी केली.