आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या, नतिजा ठणठण गोपाल’ अशी आहे. महसूल अंदाजपत्रक 356 कोटींचे आहे. तर 383 कोटी 59 लाखांच्या देणी आहेत. यात कर्मचार्‍यांच्या देय रकमा 176 कोटी 26 लाख आहे. याशिवाय नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात करण्यात येणार्‍या ड्रेनेज आणि रस्त्याच्या अनुदानापोटी मनपाचा हिस्सा 117 कोटी 90 लाख या दोन रकमा मिळून 194 कोटी 16 लाख इतकी रक्कम होते.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली, कर आकारणी वसुली, महापालिकेच्या मिळकतीच्या भाडेवाढीकडे दुर्लक्ष, खुल्या मिळकतीचे कर आकारणी न करणे, बोगस नळ न शोधणे आदी कारणामुळे महपालिकेचे उत्पन्न कमी येत असून, खर्च मात्र वाढत चालला. त्यामुळे महापालिकेवर कर्जाचे डोंगर आहे.

देण्यांचा बोजा वाढण्याचे कारण
एलबीटी उत्पन्न कमी, महापालिकेकडून वसुलीसाठी अनास्था, बोगस मिळकती, बोगस नळ, बांधकाम आणि वापर परवाना देताना होणारी अडवणूक, पदाधिकार्‍यांचा अनावश्यक खर्च. उत्पन्न वाढीच्या बाबीमध्ये गळत्या.

पुढे काय?
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणणे, वसुली कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवणे, नागरिकांचा विश्वास संपादन निर्माण करून थकबाकी वसूल करणे, हे केले तर महापालिकेचे उत्पन्न वाढू शकते. हे करणे गरजेचे. हद्दवाढ भागातील अनेक मिळकती महापालिकेच्या परवान्याविना उभारण्यात आल्या आहेत. या मिळकतीकडून कर घेणे आवश्यक आहे.

90 टक्के वसुली
महापालिकेची कर वसुली 30 ते 32 टक्के होते. त्यामुळे देय रकमा वाढत राहणार आहे. 90 टक्के वसुली केली तर हे सर्व एका वर्षात फिटेल. शासनाकडे अनुदान मागणीसाठी गेल्यावर पहिला प्रo्न असतो, तुमची वसुली किती? गळत्या बंद केल्या पाहिजेत.’’ अशोक जोशी, महापालिकेचे माजी मुख्य लेखापरीक्षक

रक्कम येईल तसे देणे कमी होईल
महापालिकेवर 383 कोटींचे कर्ज असले तरी ते कमी करण्यासाठी जशा रकमा उपलब्ध होतील तसे भरले जातील. ही रक्कम वाढत चालली, त्यास काय करणार?’’ डॉ. पंकज जावळे, साहाय्यक आयुक्त, मनपा, महसूल