आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेची मिळकत कर एका दिवसात अडीच कोटी जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेची मिळकत कर वसुली जोरात सुरू आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल अडीच कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. शहरातून 93 लाख तर हद्दवाढ भागातून एक कोटी 57 लाख रुपये जमा झाले. एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे 31 कोटी रुपये जमा झालेले आहेत.


शहराच्या तुलनेत हद्दवाढ भागात दैनंदिन सुविधा देण्याबाबत नेहमी ओरड असते. कर भरूनही आम्हाला नागरी सुविधा मिळत नसल्याची खंत हद्दवाढ वासीयांकडून व्यक्त केली जात होती. यंदा जुलैत नवीन बिले वाटप झाली. कर भरण्यास 1 ऑगस्टपासून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. या पंधरा दिवसांत एकरकमी बिल भरणार्‍यांना पाच टक्के सूट देण्यात आली होती. महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यपध्दतीमुळे महापालिका यंत्रणेवर आलेली मरगळही दूर झाली. याचा परिणाम वसुलीवर झाला आणि उत्तम अशी वसुली झाली.


चांगली वसुली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुली चांगली झाली आहे. त्यातही 1 ते 14 ऑगस्टपर्यंत उत्तम वसुली झाली आहे. नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्ण काम सुरूआहे. येत्या काळात यापेक्षाही चांगली वसुली होणार.’’ डॉ. पंकज जावळे, साहाय्यक आयुक्त


काही भागात बिले वाटपात गोंधळ
अनेक नागरिकांना बिले दिलेल्या तारखेपेक्षा उशिरा मिळाली. काहींना पंधरा दिवसांपेक्षा जास्त उशिरा मिळाली. सूट मिळवण्यासाठी त्यामुळे काहींना कमी दिवसांत पूर्ण रकमेची जुळवाजुळव करावी लागली. झाल्याने सूट घेण्यापासून वंचित राहिले.


शहराची वसुली
1 ते 15 ऑगस्ट : पाच कोटी
1 एप्रिल ते आजपर्यंत : 20 कोटी 80 लाख
हद्दवाढची वसुली
1 ते 15 ऑगस्ट: तीन कोटी 66 लाख
1 एप्रिल ते आजपर्यंत: 10 कोटी 56 लाख