आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Education Department Dismiss Solapur

महापालिका शिक्षण मंडळांचे विसर्जन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संलग्न प्राथमिक शिक्षण मंडळे, समित्या बरखास्त केल्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. अशा समित्यांच्या सदस्यांनी पदे रिक्त करावीत आणि शासन नियुक्त अधिकार्‍यांनी याबाबत फेरबदल होईपर्यंत सोपवलेले काम नेहमीप्रमाणे करण्याची सूचना देण्यात आली. 30 जून रोजी राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना निघाली.

सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याबाबत केंद्राने 2002 मध्ये 86 वी घटना दुरुस्ती केली. एक एप्रिल 2010 पासून या सुधारणा अमलात आणल्या. राज्य शासन आणि स्थानिक समित्यांकडे त्याची जबाबदारी दिली. शाळांची मान्यता, शिक्षकांच्या नियुक्त्या, त्यांच्या सेवा-शर्ती, विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण, अभ्यासक्रम, मूल्यमापन आदी त्यांनी पाहायच्या आहेत. या नव्या तरतुदींमुळे उर्वरित पान 3

राज्याच्या कायद्यातील काही तरतुदी निर्थक झाल्या. त्यामुळेच स्थानिक मंडळे आणि समित्या बरखास्त केल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

पुढील आदेशापर्यंत
अधिसूचनेप्रमाणे मंडळांचे विसर्जन झाले तरी फेरबदल अथवा सुधारणा अद्याप सुचवलेल्या नाहीत. त्या येईपर्यंत प्रशासनाचे काम नेहमीप्रमाणेच सुरू राहील. -विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ

माहिती घ्यावी लागेल
महापालिका व नगरपरिषदांमध्येच स्वतंत्र शिक्षण मंडळे असतात. जिल्हा परिषदेत शिक्षण मंडळच नसते. नव्या अधिसूचनेत नेमके काय आहे, याची माहिती घ्यावी लागेल.- राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक