सोलापूर- महापालिकाविरोधी पक्षनेतेपदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी नगरसेवक संजय कोळी अथवा इंदिरा कुडक्याल यांना संधी मिळण्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका आवारात सुरू आहे. याशिवाय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मर्जीतील नगरसेवक नरेंद्र काळे, शिवानंद पाटील यांची नावेही इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. महापालिकेत नऊ महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, मनपा रेकाॅर्डवर विरोधी पक्षनेते म्हणून कृष्णाहरी दुस्सा यांचे नाव आहे.
कोळीयांचा दावा
विरोधीपक्षनेतेपद मिळावे म्हणून नगरसेवक संजय कोळी यांनी मागणी केली आहे. कोळी समाजास पद मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
महिलांनासंधी द्या
सलगतीनवेळा नगरसेविका झाले. मात्र, आतापर्यंत पद मिळाले नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे संधी मिळावी असा दावा कुडक्याल यांचा आहे.
अशी आहे स्पर्धा
मनपागाळ्याच्या मुद्द्यावरून नागेश वल्याळ पालकमंत्री देशमुख यांच्याजवळ आल्याने त्यांचेही नावे चर्चेत आहे. हद्दवाढ भाग, युवक आणि उच्चशिक्षित नगरसेवकांचा विचार झाल्यास नरेंद्र काळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. श्रीकांचना यन्नम या दरवेळी इच्छुक असतात, पण त्यांना अद्याप संधी मिळाली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी दावेदार असलेले विजया वड्डेपल्ली, चंद्रकांत रमण शेट्टी यांना स्थायी समिती सदस्यपद दिल्याने त्यांच्या नावाचा जोर कमी झाला आहे.