आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका आयुक्त गुडेवार यांचा सावस्करांना दणका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील बेकायदा बांधकामाविरोधात जोरदार कारवाई सुरू असतानाच पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंगळवारी धाडसी पाऊल उचलले. वहिवाट बंद असलेली जागा नियम डावलून घेणे, स्वहित साधून बांधकाम व वापर परवाना देणे आदी कारणांमुळे बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचा ठपका ठेवून नगर अभियंता सुभाष सावस्कर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 59, 1 नुसार नगर अभियंता या पदावर राहण्यास अपात्र (अनर्ह) का ठरवू नये, याचा खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचा आदेशही आयुक्त गुडेवार यांनी दिला.