आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा तिजोरीत एलबीटीचे 1 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एलबीटी थकबाकीपोटी महापालिकेने व्यापार्‍यांच्या सुनावण्या सुरू केल्या आहेत. सोमवारी 200 व्यापार्‍यांची सुनावणी घेण्यात आली. एलबीटीपोटी संकलित धनादेश आणि बॅंकेत जमा झालेल्या रोख रकमेचा अंदाजे आकडा 1 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे साहाय्यक आयुक्त अमिता दगडे यांनी सांगितले.

एलबीटीची सुनावणी सोमवारी सुरू होती. सुनावणीसाठी आलेल्या व्यापार्‍यांकडून विवरणपत्र आणि दंडात्मक रक्कम भरून घेण्यात येत आहे. 1 एप्रिल ते 23 डिसेंबरपर्यंत एलबीटीपोटी 84.45 कोटी रुपये वसूल झाले. मागील वर्षाच्या तुलनेने 34 कोटी रुपये अधिक एलबीटी यंदा वसूल झाली.