आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवरणपत्रासाठी मिळाली छोट्या व्यापार्‍यांना मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानिक संस्था कर(एलबीटी)चे विवरणपत्र न भरलेल्या व्यापार्‍यांना दंड केला जात आहे. त्यात छोट्या व्यापार्‍यांना सवलत देण्यात आली आहे. त्यांना विवरणपत्र भरण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर दंड वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. वार्षिक लाखाच्या आत उत्पन्न असणार्‍या छोट्या व्यापार्‍यांना दहा हजार रुपये भरणे जिकरीचे होत आहे. विवरण पत्र न भरलेल्या 2011-12 व 2012-13 या आर्थिक वर्षासाठी दहा हजार रुपये दंड वसूल करणे सुरू आहे. त्यातून 19 लाख रुपये महापालिकेस मिळाले.

पंधरा मिनिटांत नोंदणी
महापालिकेत 100 रुपये शुल्क घेऊन 15 मिनिटांत नोंदणी करून विवरण पत्र भरून दिले जाणार आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त अमिता दगडे यांनी दिली.

26 डिसेंबरपर्यंत वसुली (कंसात 2012-13चे आकडे)
एलबीटी : 85.58 कोटी (49.81)
एस्कॉर्ट : 21.65 कोटी (24.88)
एकूण 107.24 कोटी (74.69)

असा होईल दंड
- लाख ते पाच लाखपर्यंत दोन हजार
- पाच ते दहा लाखपर्यंत तीन हजार
- दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर पाच हजार रुपये