आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Member Anant Jadhav Dismiss Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षा झालेल्या जाधवांचे महापालिका सदस्यत्व रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका सर्वसाधारण सभेस सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे प्रभाग क्रमांक 7 ब मधील भाजपचे नगरसेवक अनंत ज्ञानेश्वर जाधव यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले. 1 जानेवारी ते 30 जून 2013 या कालावधीत झालेल्या सभांना ते गैरहजर होते. याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नव्हता. यामुळे मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 1949 मधील कलम 11 (क) दि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँक्टनुसार त्यांचे सदस्यत्व आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 1 जुलैपासून रद्द ठरवले. पुढील कारवाईसाठी या पत्राची प्रत विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे पाठविण्यात आल्याचे महापालिका जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले. जाधव यांना एका खून प्रकरणात त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे.