आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार: कालच केला, आज खोदला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात नुकतेच डांबरीकरण केलेले रस्ते खोदण्याचा सपाटा सुरू आहे. यातील कळस म्हणजे रस्ते खोदण्याचे काम संबंधित विभागाला न विचारताच सुरू आहे. यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे.
आधीच महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. रस्ते दुरुस्ती, विकासकामांसाठी पैसे नाहीत. पैसे वेळेत मिळण्याची शाश्वती नसल्याने मक्तेदार काम करायला तयार नाहीत. महापालिकेचे धनादेश वटत नाहीत. दुसरीकडे मक्तेदाराच्या फाइली गायब होत आहेत. अशा प्रतिकूल स्थितीत नुकतेच केलेले डांबरी रस्ते पुन्हा खोदण्यात येत आहेत.
रूपाभवानी चौक
रस्ता करताना जलवाहिनी फुटली असेल तर तो रस्ता पुन्हा संबंधित मक्तेदाराकडून करून घेणे अपेक्षित आहे. शिवाजी चौक ते रूपाभवानी चौकापर्यंत एमएसआरडीसीचा रस्ता करण्यात येत आहे. मंत्री-चंडक सोसायटीपासून रूपाभवानी चौकापर्यंतचा रस्ता शुक्रवारी दुपारी करण्यात आला. त्या रस्त्यावरील रूपाभवानी चौकात शनिवारी पहाटे दोन वाजता जलवाहिनी फुटली. त्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. त्या कामाच्या दुरुस्तीसाठी नवीन रस्ता खोदला गेला.
बलिदान चौक
बलिदान चौक ते लिंगायत स्मशानभूमी दरम्यान नगरोत्थान योजनेतून रस्ता केला. एक किमी रस्त्यासाठी तीन कोटी खर्च महापालिका करत असताना तो रस्ता बिनधास्तपपणे खोदला जात आहे. केबल टाकण्यासाठी खोदाई सुरू आहे. मात्र, याबाबत महापालितेच्या रस्ते विभागास माहिती नाही हे विशेष.

या ठिकाणी खोदले रस्ते : सम्राट चौक, अशोक चौक, रंगभवन
रस्ता झाला रात्रीत : सैफुल ते इंडियन माॅडेल स्कूल दरम्यानचा रस्ता शुक्रवारी रात्रीतून करण्यात आला. एकीकडे रात्रीतून खोदकाम करायचे आणि दुसरीकडे रात्रीतून रस्ता करायचा. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाची काय स्थिती राहणार? हा प्रश्न पडला आहे. शहरातील मागील वर्षात केलेल्या रस्त्याची चौकशी केल्यास दर्जा दिसून येईल. सैफुल येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नव्याने करण्यात आले आहे.
जलवाहिनी फुटल्याने रस्ता खोदण्यात आला आहे. हा रस्ता नुकताच करण्यात आला होता.
नव्या रस्त्यावर खड्डे खोदले जातात, पण दुरुस्ती तातडीने होत नाही
अहवाल रखडला
मुख्यमंत्री निधीतून हद्दवाढ भागात पाच कोटींचे ७३ रस्ते करण्यात आले. त्यात अपहार झाल्याने त्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत गुडेवार आयुक्त असताना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली. चौकशी झाली. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. याबाबत चौकशी करणाऱ्या संस्थेस महापालिकेने बिल अदा केले नसल्याचे सांगण्यात आले. बलिदान चौक ते रूपाभवानी डांबरीकरण केलेला रस्ता केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला.
माहिती नाही, पाहतो
- बलिदान चौकातील रस्ते खोदकामाविषयी माहिती नाही. चौकशी करण्यात येईल. रूपाभवानी चौकात जलवाहिनी फुटली म्हणून रस्ता खोदला. नाईलाज आहे. एमएसआरडीसीचा रस्ता खोदकाम केल्याबाबत रस्ते विभागाकडून ड्रेनेज विभागास नाेटीस काढण्यात आली आहे.”
शांताराम अवताडे, उपअभियंता, रस्ते विभाग, महापालिका
बातम्या आणखी आहेत...