आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 10 रस्त्यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात मुख्यमंत्री निधीतून ५९ रस्ते करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार १५ रस्ते कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ५९ रस्ते चौकशीसाठी विविध विभागांचे पथके नियुक्त केली आहेत. मात्र, २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत फक्त १० रस्त्यांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार सुभाष देशमुख यांनी बांधकाम मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
जुळे साेलापुरातील महापालिकेने रस्ते निकृष्ट पद्धतीने झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ५९ रस्ते चौकशीसाठी पथकांची नियुक्ती केली आहे. गेल्या महिनाभरात १० रस्त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये एका पथकाकडून फक्त दोन रस्त्यांची चौकशी पूर्ण करण्यात आल्याचे समजते.
असाआहे मनपाचा अहवाल...
मनपानेजिल्हाधिकारी यांच्याकडे १५ रस्त्यांचा प्राथमिक चौकशी अहवाल दिला आहे. यामध्ये ७७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. हे १५ रस्ते जुळे सोलापूर परिसरातील अाहे. या कामांमध्ये खडी, डांबर योग्य प्रमाणात वापरण्यात आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. संबंिधत मक्तेदाराचे बिल अदा करू नये, असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयास मनपा आयुक्तांनी दिले आहे. मुख्यमंत्री विशेष निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था. सिंहगड अपार्टमेंट ते अर्जुन घरापर्यंत हा रस्ता उखडल्याचे दिसत आहे.
लक्षवेधी मांडणार
शहरात मुख्यमंत्री निधीतून झालेल्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने महिनाभरात फक्त १० रस्त्यांची चौकशी केली आहे. रस्ते कामांमध्ये अपहार झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यानंतर रस्त्यांच्या चौकशीत दिरंगाई होत असल्याने याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. याप्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. सुभाषदेशमुख, आमदारदक्षिण सोलापूर
माहितीघेणार
मुख्यमंत्री निधीतून झालेल्या रस्त्यांच्या चौकशी प्रकरणी मला माहिती नाही. चौकशीस का विलंब झाला? याची तत्काळ माहिती घेऊन चौकशी पूर्ण करण्यासंबंधी आदेश देण्यात येतील. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी
चौकशीपूर्ण करू
तत्कालीनजिल्हाधिकारी गेडाम यांनी मुख्यमंत्री निधीतून झालेल्या ५९ रस्त्यांची चौकशी करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.यासाठी प्रत्येक पथकास वेळापत्रक दिले आहे. एका पथकाकडे ते ११ रस्ते देण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरात १० रस्त्यांची चौकशी करण्यात आली आहे. उर्वरित ४९ रस्त्यांची चौकशी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. शशिकांतगोसावी, प्राध्यापक,वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय.
चौकशी रखडण्याचे कारण...
सर्वचपथकांना एकाच वेळी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र प्रत्येक पथकाकडून ठराविक वेळेतच चौकशी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, पंतप्रधान ग्रामसडक योजना, महापालिका वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या पाच विभागातील अभियंत्यांचा समावेश आहे. एकाच वेळी सर्वांना वेळ मिळणे अशक्य असल्याने प्रत्येकांची वेळ घेऊन वेळापत्रक ठरविण्यात आले. त्याप्रमाणे चौकशी सुरू असल्याचे चौकशी समितीचे समन्वयक प्रा. शशिकांत गोसावी यांच्याकडून सांगण्यात आले.
जिल्हाधिका-यांकडूनचौकशीचे आदेश
मुख्यमंत्रीविशेष निधीतून दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये मार्च २०१४ ते जून २०१४ या कालावधीत रस्ते करण्यात आले होते. यासाठी महापालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते. रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यापैकी १५ रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानुसार या रस्त्यांची तपासणी केली असता यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी सर्वच रस्त्यांच्या चौकशीचे आदेश दिले.
रस्ते चौकशीसाठी यांची नियुक्ती
उपअभियंताएस. एल. माने जी. ए. क्षीरसागर यांच्याकडे दोन, उपअभियंता ए. ए. खैरदी एम. झेड. अंधारे यांच्याकडे दोन, उपअभियंता पी. व्ही. पंडित ए. टी. निमकर यांच्याकडे १०, उपअभियंता एस. ए. पाटील डी. डी. परदेशी यांच्याकडे १०, एस. एस. बनसोडे बी. एस. थोंटे यांच्याकडे तर के. डी. घाडगे एस. एस. कोठारगस्टी यांच्याकडे ११ रस्ते चौकशीसाठी देण्यात आले आहेत. या सर्व रस्त्यांचे समन्वयक म्हणून वालचंद महाविद्यालयाचे शशिकांत गोसावी यांची नियुक्ती केली.