आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील वर्षाच्या तुलनेने मनपाच्या वसुलीत घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेने मागील आर्थिक वर्षात ४३३ कोटी ४१ लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात २८० कोटी १४ लाख रुपयांची वसुली झाली. टक्केवारीत हा आकडा ६४.६४ टक्के होतो. २०१३-१४ वर्षाच्या तुलनेने वसुली २४ कोटीने कमी झाली आहे. एकूण टक्केवारीत ३.५४ टक्के घट झाली आहे.

पालिकेच्या १७ विभागांची वसुली ३१ मार्चपर्यंत पूर्ण झाली. मागील वर्षात मनपा सभेने ४३३ कोटी ४१ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २८० कोटी १४ लाख २२ हजार ८९९ रुपये वसुली झाली आहे. सन २०१३-१४ मध्ये ४४६ कोटींचे उद्दिष्ट दिले असताना ३०४ कोटी वसुली झाली होती. मागील दोन वर्षाच्या तुलनेने सन २०१४-१५ ची वसुली २४ कोटीने कमी आहे.

दोन विभागांची १०० टक्के वसुली : नगर अभियंता कार्यालयाने २७.३६ काेटी वसुली करत १०२ टक्के वसुली केली, तर क्रीडा विभागाने ३२.१७ लाख इतकी वसुली करत १२८ टक्के वसुली केली. सर्वात कमी मंडई विभागाने ३१.१९ तर सहाय्यक आयुक्त सर्वसाधारण कार्यालयाने १२.३८ टक्के इतकी वसुली केली.

वसुली अशी (कोटीत)
एलबीटी- १४१.८४, कर आकारणी - ६०.१३, गवसु - २.५७, हद्दवाढ - ३८.९६, भूमी मालमत्ता - ४.८३, मंडई - ०.७९, उद्यान - ०.११, सार्वजनिक आरोग्य अभियंता - २.०६, नगर अभियंता - २७.३६, आरोग्य विभाग - ०.४२, झोन क्रमांक एक ते आठ - ०.२०, सहाय्यक आयुक्त सर्वसाधारण - ६८ हजार, स्मृती मंदिर - ०.११, क्रीडा - ०.३२, विधान सल्लागार - ६०० रुपये, अभिलेखापाल - ०.३३, यूसीडी ०.३.
बातम्या आणखी आहेत...