आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School Issue At Solapur, Divya Marathi

आता महापालिका शाळेतील मुल शाळेत जाणार बुट, टाय अन् कोटात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका शाळांतील मुलांच्या गणवेशात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांच्या गणवेशाला स्पर्धा करणारे ड्रेस कोड देण्यात आले आहे. त्यामुळे मनपा शाळेतील मुले आता साध्या गणवेशाऐवजी शर्ट, पँट आणि टायमध्ये तर मुली चुडीदार, सलवारवर कोट घालून ऐटीत येतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे.

या विद्यार्थ्यांना गणवेश
महापालिका शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती, जमातीतील सर्व मुले आणि उर्वरित सर्व प्रवर्गातील दारिद्रय़रेषेखालील मुलांना मोफत शालेय गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. शिक्षण मंडळाने 3 हजार 735 विद्यार्थ्यांसाठी 14 लाख 94 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश परिधान करून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्याचा आनंद घेता येणार आहे. शाळेची शिस्तही पाळली जाणार आहे.

व्यवस्थापन समित्यांनाच असणार अधिकार
गणवेश खरेदीचे संपूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले आहेत. गणवेशासाठी कापड खरेदी करून ते शिवून घ्यायचे किंवा तयार गणवेश घ्यायचे, हा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यायचा आहे.

असा असेल ड्रेस कोड
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका शाळेतील मुलांचा ड्रेस कोड साधा होता. यंदापासून मुलांना चॉकलेटी पॅन्ट व बदामी शर्ट आणि टाय तर मुलींना चुडीदार, सलवार आणि जॅकेटचा गणवेश असेल.
5 200 एका गणवेशास अनुदान
02 गणवेश मिळणार एका विद्यार्थ्याला
3775 एकूण विद्यार्थी आहेत शालेय गणवेशास पात्र
14.94 लाख गणवेशासाठी अनुदान
60 महापालिकेच्या एकूण शाळा