आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School News In Marathi, Divya Marathi

राजीनामा न दिल्यामुळे कटके यांची अवहेलना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, शाळेत सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे यासह शैक्षणिक विकास करणे शिक्षण मंडळातील सदस्यांकडून अपेक्षित असते. परंतु या सदस्यांनी गुरुवारी इंदिरा गांधी स्टेडियम येथे शालेय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसमोर ‘तमाशा’ केला. सभापती प्रा. कटके बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला. निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजीत काही विद्यार्थीही सहभागी झाले. हा प्रकार पंधरा मिनिटे सुरू होता.

गेल्या महिन्यापासून गायब असलेले शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके हे स्पर्धेच्या कार्यक्रमात दाखल झाले. त्यावेळी हा प्रकार घडला. सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी त्यांना बोलण्यापासून मज्जाव केला. हा सर्व तमाशा विद्यार्थ्यांसमोर घडल्याने शिक्षण मंडळाची नाच्चक्की झाली. पक्षाअंतर्गत राजकारण विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शित झाला.

महानगरपालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असून, त्यांच्यातील अंतर्गत करारानुसार दरवर्षी शिक्षण मंडळाचे सभापती बदलायचा आहे. त्यामुळे दुसरे वर्ष राष्ट्रवादीकडे सभापतिपद जाणार आहे. कॉंग्रेसचे प्रा. व्यंकटेश कटके यांनी सभापतिपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर सत्ताधारी सदस्यांकडून अविश्वास ठराव आणण्यात प्रयत्न सुरू आहेत.

बोलण्यास मज्जाव
महापालिका शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रा. कटके आले होते. त्यापूर्वीच स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला. त्यावेळी मंचावर शिक्षण मंडळाचे विरोधीपक्ष नेते दत्तात्रय गणपा, प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे होते. सत्ताधारी आठ सदस्य खाली थांबले होते. उद्घाटन झाल्यानंतर सभापती प्रा. कटके बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी काँग्रेसच्या केदार मेंगाणे यांनी त्यांना बोलण्यापासून मज्जाव केला. माइक हिसकावण्याचा प्रयत्न झाला. कटके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

निषेधाच्या घोषणा दिल्या
पक्षाचे आदेश न मानणार्‍या प्रा. कटके यांचा धिक्कार असो, धनादेशवर स्वाक्षरी न करता वेतन अडवणार्‍या सभापतीचा निषेध असो, सभापती थू.थू..थू.. आदी प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आले. यात जावेद खैरदी, सभापगृह नेता पांडुरंग चौधरी, अरुणा वर्मा, जाबीर अल्लोळी, गोवर्धन कमटम, राजासाब बागवान आदीचा समावेश होता.

पक्षादेश न मानल्याने विरोध
शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही सभापती प्रा. कटकेंच्या विरोधात घोषणा दिल्या. पक्षाचा आदेश न मानल्याने त्यांचा विरोध आम्ही केला. क्रीडा स्पर्धेची तयारी आम्ही केली, त्यांनी कोणतेच कारण न देता मिटिंगला गैरहजर राहिले. महिन्यापासून गायब असलेले सभापती अचानक आल्याने आम्ही त्यांचा निषेध केला. पांडुरंग चौधरी, सभागृह नेता, मनपा शिक्षण मंडळ