आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School Teacher Issue Solapur

मनपा शाळेत 51 गुरुजी जादा; शासनाला 49.71 लाखांना चुना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडून अतिरिक्त शिक्षकांवर सुमारे 50 लाखांचा नियमबाह्य खर्च करण्यात आला. यातील नुकसान झालेल्या रकमेची वसुली कोणाकडून करावी जाची जबाबदारी निश्चित करावी, असा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक निधी लेखा विभागाने दिला आहे. हा अहवाल शिक्षण मंडळाला 7 मे रोजी प्राप्त झाला.

शिक्षण मंडळाच्या सन 2011-12 च्या शैक्षणिक वर्षाचे लेखापरीक्षण पाच नोव्हेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत स्थानिक निधी लेखापरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले. दोन फेब्रुवारी 2013 रोजी सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षक जी. एल. जगदाळे यांच्याकडे तो शासनाच्या विभागकडून सादर झाला. या अहवालात एकूण 49 प्रकारच्या त्रुटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या एकूण त्रुटीतून शिक्षण मंडळाकडून शासनाचे 49 लाख 72 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याने त्याची जबाबदारी निश्चित करावी असे म्हटले आहे. या लेखापरीक्षण अहवालाच्या कालावधीत सुनील रसाळे हे सभापती तर सत्यवान सोनवणे हे प्रशासनाधिकारी म्हणून होते, याचाही उल्लेख अहवालात आहे.


प्रशासन अधिकारी म्हणतात..
पत्र दिले होते..

महापालिका शाळेत चालू शैक्षणिक वर्षात 13 शिक्षक अतिरिक्त असून, त्यांना समायोजित करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले. 55 ही संख्या 2011 मधील असेल. अन्य त्रुटीबाबत लेखापरीक्षण समितीस माहिती देण्यास शिक्षण मंडळ कमी पडले असेल. विष्णू कांबळे, मनपा शिक्षण मंडळ

माजी सभापती म्हणतात..
हे काम प्रशासनाचे

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे काम प्रशासन अधिकार्‍यांचे आहे. संबंधित लिपिक टिप्पणी ठेवतो, त्यावर सभापतींची संमती घेतली जाते. त्यामुळे तेच जबाबदार आहेत. सुनील रसाळे, शिक्षण मंडळ