आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांनंतर विषय मागे घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका स्थायी समितीत आर्थिक बाबीशी निगडित विषय असतात, निविदा काढणे आणि देण्याचे विषय असतात. ते विषय पाठवल्यावर पंधरा दिवसांच्या आत त्यावर निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यानंतर त्यास मानवी मंजुरी मिळाली असे गृहित धरून महापालिका आयुक्त त्यावर पुढील निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास आम्ही आमचे अधिकार वापरू, असे मत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पालिका सभागृहात सांगितले.

स्थायी समितीत पाकीट संस्कृती असल्याचा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आरोप केला, तसेच सभापती इब्राहिम कुरेशी यांनी त्यांच्यावर प्रत्यारोप केला. शुक्रवारी सकाळी होणारी सभा तहकूब केल्याने त्यांचे पडसाद सायंकाळी सभागृहात उमटले. उपस्थित एका प्रश्नावर आयुक्त गुडेवार यांनी उत्तर दिले. स्थायीत अनेक विषय प्रलंबित आहेत. निविदा काढण्याच्या विषयावर पंधरा दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास ते त्यांच्याकडून घेण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यानंतर त्या कामाची पुढील प्रक्रिया सुरू करता येते. या नियमांचे पालन होत नव्हते ते यापुढे आयुक्त गुडेवार करणार आहेत.

समितीत पाकीट संस्कृती आहे, तेथे ट्रॅप लावणे आदी मुद्यावरून संघर्ष सुरू आहे. सभापती इब्राहिम कुरेशी आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यात पाकीटमुळे वाद झाले. सभा न घेण्याचा चंग सभापतीने बांधल्याचे दिसून येते. तेथे विषय असताना अन्य कारणे पुढे करत घेतले जात नाही. त्यामुळे स्थायीत सध्या सन्नाटा आहे.

आज सभा
शुक्रवारी तहकूब केलेली सभा शनिवारी घेणार आहे. त्यात आठ झोनमध्ये 16 मक्तेदार नेमणे, जंतुनाशक औषध फवारणी करणे, कचरा गाड्यासाठी टायर खरेदी करणे.

आयुक्तांनी अधिकार वापरावा
स्थायी समितीत मुद्दाम विषय प्रलंबित ठेवतात. यावर मी वारंवार आवाज उठवला. सत्तेचा, बळाचा वापर केला जातो. 15 दिवसांत विषय मंजूर करावेत असा नियम असेल तर तो आयुक्तांनी वापरावे. त्यामुळे स्थायीत विषय घेतले जातील.’’ सुरेश पाटील, स्थायी समिती सदस्य