आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation UCD Department Fraud Case Solapur

महापालिकेच्या घोंगडी, कांबळी खरेदीत 54 लाखांची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका यूसीडी विभागाचे समूह संघटक पॉल जगले यांनी परस्पर ऑर्डर देऊन सुमारे 53 लाख 82 हजार रुपयांच्या घोंगडी आणि कांबळी खरेदी केली. प्रत्यक्षात महापालिकेच्या ताब्यात ते साहित्यच मिळालेले नाही. त्यामुळे महापालिकेची 53 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी समूह संघटक जगलेसह घोंगडी उत्पादक संस्थेविरुद्ध सदर बझार पोलिसात फसवणुकीची तक्रार शुक्रवारी रात्री देण्यात आली आहे.

यूसीडी विभागाचे प्रकल्प संचालक लक्ष्मण बाके यांनी ही तक्रार केली आहे. घोंगडी आणि कांबळी पुरवठा करण्याचे काम मिळावे म्हणून सोलापूर जिल्हा अहिल्यादेवी खादी ग्रामोद्योग घोंगडी उत्पादक सहकारी संस्थेने (पंढरपूर) 7 फेब्रुवारी 2013 रोजी मनपाकडे अर्ज केला होता. सहाय्यक आयुक्ताकडून 14 फेब्रुवारी रोजी नगर अभियंता कार्यालयास तो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. यूसीडी विभागास आदेश व आर्थिक तरतूद नसताना समूह संघटक पॉल जगले यांनी 31 मे रोजी सहकारी संस्थेस घोंगडी व कांबळी पुरवठय़ाचा आदेश दिला. 9 जुलै 2013 रोजी 375 रुपये प्रति नग उर्वरित पान 12

याप्रमाणे सहा हजार घोंगडे रक्कम 22.50 लाख आणि 522 प्रमाणे 6 हजार लोकरी चादर असे 31 लाख 32 हजार रुपये एकूण 53 लाख 82 हजार रुपयांचा माल खरेदी केला. परंतु यासंदर्भातील माहिती मनपाच्या कोणत्याच कर्मचार्‍यांकडे नाही. इतकेच नव्हे तर त्या मालाची एलबीटी 1.25 लाख रुपये त्या पुरवठदारांकडून जगले यांनी घेतली, पण ते मनपा खात्यता जमा नसल्याचे समोर आले.

असे उलगडले बिंग
पुरवठा केलेल्या मालाचे बिल मागण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी ढोबळे आणि मुलाणी यूसीडी विभागात आल्यानंतर विभाग प्रमुख बाके यांना हा प्रकार समजला. बाके यांनी संस्था प्रतिनिधीस आयुक्त गुडेवार यांच्यासमोर नेले. त्याने घटनाक्रम कथन केला. चौकशी अंती मनपाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसात तक्रार दिली आहे.

महापालिकेकडून तक्रारी अर्ज आलेला आहे. मनपाच्या फसवणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करीत आहोत. उशीरा गुन्हा दाखल होऊ शकतो. - रवींद्ग थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक