आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेपुढे 732 कामांची यादी; महापालिका प्रशासनाने केली 24 कोटींची तरतूद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विकासकामांसाठी नगरसेवकांच्या निधी वाटपावरून महापालिका सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर आता 30 डिसेंबर रोजी सभा बोलावून त्या विषयावर निर्णय घेण्याची तयारी सत्ताधार्‍यांनी केली आहे. 24 कोटींतून शहरात 732 विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यांची यादी महापालिका सभागृहात सादर करण्यात आली आहे.

नगरसेवकांनी प्रामुख्याने रस्त्याची कामे सुचवली आहेत. स्वीकृत नगरसेवक शैलेंद्र आमणगी (शिवसेना) आणि राजा खराडे (काँग्रेस) यांनी सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत यादी दिली नव्हती. निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांत एकमत झाल्याचे दिसून येत नाही. महापालिका आयुक्तांनी 20 डिसेंबरच्या सभेत विषय दाखल केला. त्यानंतर महापौरांसह 105 नगरसेवकांनी यादी दिली.

खराडेंची यादी कोठेंकडे, आमणगी देणार आज
स्वीकृत नगरसेवक राजकुमार खराडे यांनी यादी दिली नाही. याबाबत त्यांना विचारले असता, माझ्या कामाची यादी देवेंद्र कोठे यांना दिली आहे. ते यादी देणार आहेत. तर माझ्या कामाची यादी सोमवारी निश्चित झाली आहे. सायंकाळी देणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी हद्दवाढ भागात कामे सुचवली आहेत, असे आमणगी यांनी सांगितले.

रिलायन्सकडून 31 कोटी जमा
शहरात रिलायन्स कंपनीकडून ओएफसी केबललाइन घालण्यात येत असून, त्यासाठी शहरातील सर्व झोन कार्यालयअंतर्गत येणारे रस्ते खोदण्यात आले आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून कंपनीने 31 कोटी 7 लाख 80 हजार 443 रुपये जमा केले आहेत.

हद्दवाढ भागात जादा निधी
हद्दवाढ भागातील प्रभागांचा आकार मोठा आहे. त्यामुळे तेथे जादा निधीची गरज आहे, असा सूर हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी लावला आहे. त्यामुळे त्यांना इतरापेक्षा दहा लाख रुपये निधी जास्त देण्याची शक्यता आहे.
ही कामे होणार (कंसात रक्कम)
रस्ते : 420 (13 कोटी 90 लाख)
ड्रेनेज : 144 (4 कोटी 76 लाख)
जलवाहिनी : 74 (2 कोटी 31)
दिवाबत्ती : 42 (1 कोटी 24 लाख)
इतर : 52 (1 कोटी 58 लाख)