आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज महापौर, उपमहापौर निवड, हात उंचावून होईल मतदान, सेनेने तलवार केली म्यान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येणा-याअडीच वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची शनिवारी निवडणूक होणार आहे. काँग्रेस आघाडी आणि महायुती यांच्यात सामना होईल. हात उंचावून मतदान होणार असल्याने चुरशीची शक्यता मावळली आहे. महेश कोठे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना उत्साहीत झाली होती. परंतु, हाती काही लागणार नाही हे लक्षात आल्याने सेनेने तलवार म्यान केल्यात जमा आहे.
सकाळी ११ वाजता मनपा सभा सुरू होईल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ सुरेश काकाणी हे उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया होईल. त्यानंतर उमेदवारांची नावे पुकारली जातील आणि हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. पहिल्यांदा महापौर पदाची निवडणूक होईल, त्यानंतर उपमहापौर पदासाठी मतदान होईल.
काँग्रेसने महापौर पदासाठी नेहरूनगर (विजापूर रोड) परिसरातील नगरसेविका सुशीला आबुटे यांना संधी दिली आहे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्णिकनगर परिसरातील नगरसेवक प्रवीण डोंगरे यांना संधी दिली आहे. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने आबुटे यांना महापौर पदाची लॉटरी लागली आहे. पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपने महापौर पदासाठी नरसूबाई गदवाल तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी मेनका चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी आपल्या नगरसेवकांना मतदानासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत.