आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी गुन्हा दाखल करण्याची नगरसेविकेच्या मुलाला धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रभागात वाळूचे ट्रक आल्याने ड्रेनेज चेंबरचे नुकसान झाले. त्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका मंगला पाताळे यांचे चिरंजीव सुनील पाताळे यांनी झोन कार्यालयातील लिपिकाकडे केली. लिपिकाने त्या ट्रकवर कारवाई करण्याऐवजी पाताळे यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार करण्यात आली आहे.

हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सिव्हिल हाॅस्पिटल समोरील मनपा झोन क्रमांक आठ येथील कार्यालयात घडला. यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी, शिवानंद पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी यांनी महापालिका स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांच्याकडे तक्रार केली. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश सभापती काळे यांनी सहाय्यक आयुक्त अमिता दगडे यांना दिला.
बातम्या आणखी आहेत...