आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात युतीचे समीकरण महापालिकेत ठरेल प्रभावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिवसेनेनेराजसत्तेत सहभागाचा निर्णय घेतल्याने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गणितेही वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाताहेत. प्रदेशस्तरावरील नेत्यांनी राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्ष महायुती करूनच लढवतील अशी घोषणा केली. सोलापूर महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल लोकसभा विधानसभा निवडणुकीत शहरस्तरावर भाजप-सेनेच्या मताचा वाढलेला टकका लक्षात घेता आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या तुलनेत महायुती प्रभावी ठरेल किमान 60 जागा मिळतील, असे चित्र आहे.
काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते महेश कोठे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्यामुळेही काँग्रेस जनाधाराची शकती क्षीण झाली, सेनेचे बळ वाढल्याचे प्रत्यंतर विधानसभा निवडणुकीतील मतांमधून दिसले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबतच सुभाष देशमुख हे शहरातून आमदार म्हणून निवडून आले. यामुळे भाजपची ताकद वाढली. याउलट ‘एमआयएम’ ने काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते यांच्या सक्रियतेवरही बरेच काही आहे. माकपा आणि बसपाची ताकद मर्यादित आहे, त्यामुळे महायुतीला मनपा निवडणुकीत संख्यात्मक ताकद आजमावणे सहज शक्य असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. आता भाजप-शिवसेना याचा लाभ कितपत घेणार हा येणार काळ ठरविणार आहे.
‘एमआयएम’चा नांदेड पॅटर्न सोलापुरातही दिसेल
शहरमध्यमध्ये 10 ते12 प्रभागात एमआयएमचे प्राबल्य राहील, असे चित्र विधानसभा निवडणुकीतील जनाधरावरून लक्षात येते. एमआयएमच्या नांदेड पॅटर्नचे काँग्रेससमोर आव्हान आहे. आमदार शिंदे यावर कशी मात करतात, यावरही बरेच काही आहे. एमआयएम काँग्रेस मतविभागणीचा माकप फायदा उठवू शकते
राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची
शहरातराष्ट्रवादी नगरसेवकांचे प्रभागात वर्चस्व आहे. नगरसेवक मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे यासारखे नेते करिष्मा दाखवतील. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोलापुरात लक्ष घातल्याने आठ नगरसेवक निवडून आले होते.
कोठे आणि देशमुख यांची लागेल वर्चस्वासाठी कसोटी
महेशकोठे यांच्या गटाचे शहर उत्तरमध्ये सात नगरसेवक आहेत. बाळे, घरकुलसह काही भागात निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांना मताधिक्य मिळाले. कोठे यांचे वर्चस्व असलेले प्रभाग सध्या भाजपच्या वाट्यात असल्याने युतीला जागा वाटपाची कसरत करावी लागेल. आमदार विजय देशमुख या जागा सहज सोडणार नाहीत. मनपा कोठे यांचे वर्चस्व रोखण्यासाठी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, अॅड. यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी, ज्योती वाघमारे प्रयत्नशील राहतील. शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात १२ प्रभाग आहेत. आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या एकत्र ताकदीने तेथे युतीचा जनाधार वाढू शकतो.