आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Employees, Latest News In Divya Marathi

मनपा कर्मचार्‍यांनी केले आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-बांधकाम परवाना विभागप्रमुख दीपक भादुले यांना शिवीगाळ झाल्याचा निषेध करीत महापालिका कर्मचार्‍यांच्या वतीने मंगळवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शिवीगाळ करणार्‍या महिबूब मुजावर यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत बुधवारी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी सांगितले.बांधकाम पाडल्यामुळे चिडलेल्या महिबूब मुजावर यांनी शनिवारी महापालिकेत येऊन मनपा अधिकारी भादुले यांना शिवीगाळी करीत दमदाटी केली होती. त्यानंतर भादुले कार्यालय सोडून निघून गेले. याप्रकरणी साहाय्यक आयुक्त नमिता दगडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी या घटनेचा निषेध करीत महापालिका कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.तसेच सायंकाळी एलबीटी कार्यालयासमोर जमून कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी करीत मुजावर यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अशोक जानराव, प्रदीप जोशी, चांगदेव सोनवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भादुले ‘नॉट रिचेबल’
मनपा बांधकाम परवाना विभागप्रमुख भादुले यांचा मोबाइल मागील दोन-तीन दिवसांपासून बंद आहे. तसेच घरात नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे जानराव यांनी सांगितले. दरम्यान उपअभियंता भादुले यांनी राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती दगडे यांनी दिली.