आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Employees Salary Increase Mayor Announced On Republic Day

मनपा कर्मचार्‍यांना वेतनवाढ-प्रजासत्ताकदिनी महापौरांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-महापालिका कर्मचार्‍यांना घरभाड्याच्या भत्त्यात पाच टक्के, तर महागाई भत्त्यात आठ टक्के असे 13 टक्के वेतनवाढ करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून ही वाढ देण्यात येणार आहे. रोजंदारी सेवकांना रोज 30 रुपये वाढ करण्यात आली. बालवाडी, शिवणकाम शिक्षिका आणि लिंक वर्कर यांच्या मानधनात प्रतिमहा 200 रुपये वाढ करण्यात आल्याची घोषणा, महापौर अलका राठोड यांनी प्रजासत्ताकदिनी जाहीर केली. 1 जानेवारी 2014 पासून यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तत्काळ काढले.
निर्णयाचे कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव यांनी स्वागत केले. रोजंदारी सेवकांना 25 रुपये वाढ मागितले असता, 30 वाढ रुपये देण्यात आली. महापालिकेच्या सुमारे चार हजार 800 कर्मचार्‍यांना 13 टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे, असे महापौर म्हणाल्या. या वेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, महिला व बालकल्याण सभापती फिरदोस पटेल, परिवहन सभापती सुभाष चव्हाण, शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके, साहाय्यक आयुक्त अमिता दगडे, डॉ. पंकज जावळे आदी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
साहाय्यक अभियंता एस. के. उस्तरगे, आवेक्षक डी. व्ही. रजपूत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नीला निंबर्गी, सौ. व्ही. आय. कोनापुरे, श्यामला नागपल्ली, अभिनंदन विभूते आणि एस. एस. गाडेकर या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.