आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री फडणवीस हे आमचे आहेत की नाहीत?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी महापौर म्हणून काम केले आहे. त्यांना महापालिकेत उपमहापौर, सभागृह नेता असतो यांची माहिती आहे. बैठकीसाठी त्यांनी आम्हाला बोलवले नाही. ते मुख्यमंत्री आमचे आहेत का? अशी शंका आहे. शहर विकासाच्या बैठकीनिमित्त त्यांनी राजकारण करायला नको होते, अशी टीका महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या विषयांवर आढावा बैठक घेतली. तीत महापौर प्रा. सुशीला आबुटे आणि महापालिकेच्या सभागृहातील भाजपचे विरोधी पक्षनेते कृष्णहरी दुस्सा यांना बोलावले. उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते हेमगड्डी यांना बोलावले नाही. डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर हेमगड्डी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी हेमगड्डी यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कोणत्या राजकीय पक्षाचा नसतो. त्यांनी आम्हाला बैठकीस बोलवणे अपेक्षित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या प्रश्नांवर राजकारण
शहरातीलप्रश्नांवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणे आवश्यक होते. याविषयी विचारणा केल्यानंतर, बैठकीसाठी नावांची यादी मंत्रालयातून आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहराच्या प्रश्नावर किंवा विकासकामांवर आम्ही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत नाही. आम्हाला बोलवले नाही याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवत नाही. मुख्यमंत्र्यांचा मान आम्ही ठेवतो, असेही हेमगड्डी म्हणाले. महापालितेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवले नाही, याचा अर्थ मुख्यमंत्री अजूनही पक्षीयराजकारणातून बाहेर आलेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांना महापौरांनी दिले मागण्यांचे निवेदन
महापौर आबुटे यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. त्यात स्मार्ट सिटीत समावेश करा, एलबीटी निधी द्या, नगरोत्थान योजनेचा सरकारचा हिस्सा द्या, एलइडी दिव्यांचा प्रस्ताव मंजूर करा, चार पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यास मंजुरी द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अशोक स्तंभ मंजुरी मिळावी, संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी निधीचा सरकारी हिस्सा देऊन पुढील निधीसाठी केंद्राकडे शिफारस करावी आदींचा समावेश आहे.
महापौर म्हणाल्या, विरोधी पक्षनेता माहीतच नव्हता!
महापालिकेच्याविषयांवरील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कृष्णहरी दुस्सा यांना बोलावले होते. एरवी ही भूमिका भाजपचे पांडुरंग दिड्डी बजावत होते. त्यावर भाष्य करताना महापौर आबुटे म्हणाल्या, सभागृहातील विरोधीपक्ष नेते दुस्सा असल्याचे आम्हाला माहीतच नव्हते. आता पुढील कामाकज विरोधी पक्षनेते म्हणून दुस्साच करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीसाठी नावे आली मंत्रालयातून...
मनपा पदाधिकाऱ्यांना का बोलवले नाही याबाबत महापौर आबुटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांना विचारले. याबाबत मंत्रालयातून नावाची यादी आल्याचे देशमुख यांनी महापौर आबुटे यांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...