आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे पर्यावरणीय गांभीर्य हरवले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-पर्यावरणीय समस्यांकडे शहराचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड होत असताना पालिकेकडून तुलनेने गंभीरतेने कारवाई होत नाही. वृक्ष जतन अधिनियम 1975 नुसार पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. पण समितीचा पत्ताच नाही. याउलट मलईदार समित्यांसाठी पालिका पदाधिकार्‍यांचा कल दिसतो. ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामाची वांझोटी चर्चा मात्र नेते नेहमीच करतात.
होटगी परिसरात औष्णिक वीजनिर्मिती केंद्र सुरू होणार आहे. प्रदूषण होणार नसले तरी दक्षता म्हणून वृक्षारोपणावर भर देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वृक्षांवर कुर्‍हाड चालवण्यात येते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्यालयातील दहा झाडे बांधकाम विभागाने अनधिकृत तोडली. या प्रकरणी कार्यकारी अभियंता संजय माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकार्‍याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.