आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य खात्याकडे नाही डेंग्यूविषयी नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातडेंग्यूची लागण झालेले रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ते आटोक्यात आणण्याचे काहीही नियोजन महापालिका आरोग्य खात्याकडे नाही असे शनिवारी दिसून आले. सोमवारपर्यंत नियोजन सादर करण्याचे आदेश महापौर सुशीला आबुटे यांना द्यावे लागले.
महापौरांनी शहरातील डेंग्यूच्या स्थितीवर बैठक बोलावली होती. तीत पदाधिकारी, नगरसवेकांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगेलच धारेवर धरले.

उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, सभागृह नेते संजय हेमगड्डी, प्रभारी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी, अॅड. यू. एन. बेरिया, माजी उपमहापौर हारुन सय्यद, दिलीप कोल्हे, आनंद बनसोडे, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, साहाय्यक आयुक्त अमिता दगडे, आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती आडके, सफाई अधीक्षक रवींद्र तळवार आदी उपस्थित होते.
अत्यावश्यक बाब म्हणून त्वरित उपाययोजना का केली नाही? आरोग्य विभागाकडून औषधे खरेदी केली जात नाही, तेथील मनुष्यबळ इतरत्र का हलवले? अशी प्रश्नांची सरबत्ती करत कोल्हे, अॅड. बेरिया, चंदनशिवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले.