आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपावर काँग्रेस आघाडीचेच वर्चस्व, महापौरपदी सुशीला आबुटे तर उपमहापौरपदी डोंगरे यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पक्षांतरबंदीकायदा आणि हात उंचावून मतदान करण्याच्या प्रक्रियेमुळे युतीकडून कुठलाही चमत्कार घडला नाही. त्यामुळे शनिवारी झालेली महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक ही फक्त औपचारिक बाब ठरली. महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला आबुटे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण डोंगरे यांची निवड झाली. पक्षीय बलाबलानुसार हात उंचावून मतदान झाले. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी काम पाहिले.
दौ-यावर गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांचे हैदराबादहून लातूर, तुळजापूरमार्गे सोलापुरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आले. अकरा वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापौर पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून सुशीला आबुटे यांनी तर भाजप-शिवसेना युतीकडून नरसूबाई गदवालकर यांनी अर्ज भरले होते. उपमहापौर पदाकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून प्रवीण डोंगरे आिण भाजप-शिवसेना युतीकडून मेनका चव्हाण यांनी अर्ज भरला होता. त्यानुसार या उमेदवारांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. यानंतर सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.
निवडणूक प्रक्रियेत आयुक्त गुडेवार, नगरसचिव ए. ए. पठाण, जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे यांचा सहभाग होता. उपस्थित सदस्यांनी नूतन महापौर आिण उपमहापौरांचा सत्कार केला. समर्थकांनी महापालिकेच्या प्रांगणात मोठा जल्लोष केला. गुलालाची मुक्तपणे उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी केली. ढोलीबाजाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.
आबुटे यांनी बुधवार पेठेतील आपल्या पूर्वश्रमीच्या निवासस्थान परिसरातील मैित्रणी आणि नातेवाईक यांची भेट घेतली. कोणी त्यांना पेढे तर कोणी साखर देऊन तोंड गोड केले. महापौरांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
निवड झाल्यानंतर महापौर आबुटे यांनी काँग्रेसचे विष्णुपंत कोठे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत रिपाइंचे रवी गायकवाड यांनी आघाडीला मतदान केले. मावळत्या महापौर अलका राठोड या नूतन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या शिष्या आहेत. मात्र महापौरपदाची संधी प्रथम अलका राठोड यांना मिळाली.
पाणीप्रश्न सोडवणार
राज्यघटनेमुळेमला आज महापौर पद प्राप्त झाले. माझे वडील रिपाइंचे नगरसेवक होते. त्यांचे काम पाहून सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले. मी प्रथम पाण्याचा आणि उद्यानाचा प्रश्न सोडवणार आहे. रस्ता आणि ड्रेनेज प्रश्न मार्गी लावणार. प्रा.सुशीला आबुटे, महापौर
असे झाले मतदान
एकूणमते - १०२
महापौरपदासाठी
प्रा. सुशीला आबुटे (काँग्रेस) : ६२,
नरसूबाईगदवालकर (भाजप) : ३२
तटस्थ- ०६ (आनंद चंदनशिवे, सुनीता भोसले, उषा शिंदे, माशप्पा विटे, सुनंदा बल्ला, महादेवी अलकुंटे)
गैरहजर : ०२(महेश कोठे, मनोज शेजवाल)

उपमहापौरपदासाठी
प्रवीण डोंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) : ६२
मेनकाचव्हाण (शिवसेना) : ३२तटस्थ- ०६