आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिवहन समिती, येत्या जूनपासून रस्त्यावर धावणार तब्बल १३५ बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येत्या जूनपासून १३५ सिटी बस धावणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी पत्रकारांना दिली. सध्या ८७ बस धावत आहेत.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर विकास मिशन अंतर्गत २०० बस महापालिका परिवहन समितीच्या ताब्यात आल्या आहेत. मात्र, नियोजन नाही, त्यामुळे ११० बसगाड्या थांबून होत्या. आता त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे १३५ बसगाड्या जूनपासून धावतील.
जास्त बसगाड्यांकरता वाहक आणि चालक यांची भरती करण्यात आली. त्यामुळे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन खात्यात नियोजन नव्हते त्यामुळे गाड्या थांबून असत. व्यवस्थापक श्रीकांत म्याकलवार यांच्याकडे विषय समिती सदस्यांची तक्रार होती. त्यामुळे खोबरे यांच्याकडे पुन्हा व्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली.

अशोक लेलॅण्डवर कारवाई करा
अशोकलेलॅण्ड कंपनीच्या तीन बसगाड्यांना चेसी नंबर डबल झाल्याने पासिंग झाले नाही. त्यामुळे परिवहनचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्य कंदलगी यांनी केली. ती तांत्रिक चूक होती, ती दूर केल्याचे परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अजब प्रस्ताव...७२ हजारांचे नुकसान...
बातम्या आणखी आहेत...