आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला वेठीस धरणा-यांचा ‘स्थायी’ने घेतला कैवार, मनपा पदाधिकारी अधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अत्यावश्यकसेवेत गैरहजर राहत जनतेला वेठीस धरणाऱ्या कर्मचा-याचा कैवार स्थायी समितीने बुधवारी घेतला. बडतर्फ ४४ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासह वेतनही देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तोही एकमताने!
महापालिकेच्या हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विभागातील 24 चावीवालेंसह 44 कर्मचारी रमजान, दसरा या उत्सव काळात अत्यावश्यक सेवेत नव्हते. त्यामुळे हद्दवाढ भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यांना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बडतर्फ केले होते. दरम्यान, स्थायी समितीच्या ठरावास रद्दबातल करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘दिव्य मराठी’ला िदली. यानिमित्ताने लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. हद्दवाढ भरती प्रकरणी महापालिका प्रशासन कारवाई करेल या भीतीने हद्दवाढ भागातील 44 जण अचानक सेवेत हजर नव्हते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी मुंबई प्रा. महाअधिनियम 1949 मधील कलम ५६(४) नुसार बडतर्फीची कारवाई केली. त्या कारवाईवर मनपा स्थायी समितीने हस्तक्षेप करत बडतर्फ निर्णय मागे घ्यावे आणि त्यांना तत्काळ कामावर हजर करून बडतर्फीच्या काळातील वेतन द्यावे असा एकमताने ठराव करून ४४ कर्मचाऱ्यांना स्थायी समितीने दिलासा दिला. स्थायीत ठराव केले असले तरी ते विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवू, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी िदली.