आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकून दिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दक्षिणसोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील काटगावच्या दिशेकडे असलेल्या कॅनॉलजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोलापूर तालुका पोलिसांना सापडला आहे. मृत व्यक्तीचे वय ४५ ते ५० आहे. अंगात कपडे नाहीत.
डोक्यात दगड घालून जीवे मारल्यानंतर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती, पोलिस निरीक्षक दीपक पवार यांनी दिली. रविवारी सकाळी सातच्या सुमाराला काटगावजवळील सोमनाथ पैलवान यांच्या शेताजवळील कॅनाॅलजवळ मृतदेह पडल्याचे दिसले. पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पथक आले. श्वानपथक घटनास्थळासून दहा फुटांवरच जाऊन थांबले. मृताच्या पोटावर, डोक्यावर,मानेवर जखमांचे व्रण आहेत. अंगावर फक्त अंडरवेअर आहे. पायात पंचधातूचे कडे आणि दोरा बांधला आहे. कमरेत करदोडा असून त्याला चावी आहे. मारल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. रॉकेलचा वास आहे, दोन काड्या ओढून टाकल्या आहेत. पोलिसांनी परजिल्ह्यातील पोलिसांना या घटनेची माहिती घटनास्थळाचे छायाचित्र पाठवून दिले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक मनीषा दुबुले, निरीक्षक पवार, साहाय्यक निरीक्षक शिवाजी नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मेहेरमेिडकल दुकानात चोरी
फॉरेस्टपरिसरातील मेहेर मेिडकल दुकानात चोरी झाली आहे. प्रमोद बसनगार यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला ही घटना उघडकीस आली. शटर उचकटून कपाटातील सतरा हजार रुपये चोरीस गेले आहेत.
मुलीचाविनयभंग
पोलिसतक्रार दिल्याच्या कारणावरून एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीिडत मुलीने एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. करण राठोड, अर्जुन राठोड, नंदा राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. करणने विनयभंग केला तर अन्य दोघांनी मुलीला आईला मारहाण करून गुन्ह्यात मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करीत आहेत.

मुलीलापळवून नेले
सोनेघेऊन देण्याचे आमिष दाखवून एका मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिघांवर सलगरवस्ती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सप्टेंबर रोजी घडली असून आज फिर्याद देण्यात आली आहे. आकाश कदम, सीताबाई कदम, राहू कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आकाशने मुलीला पळवून नेले. आईने याबाबत त्यांच्याकडे चौकशीला गेल्यावर अन्य दोघांनी मिळून मारहाण केली.