आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणी दोघांना कोठडी; मंद्रूप येथील प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मागील भांडणाचा राग मनात धरून शिवानंद रामचंद्र टेळे (वय 35, रा. औराद, ता. दक्षिण सोलापूर) यांचा खून केल्याप्रकरणी दोघांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. माळप्पा महादेव रेवे (वय 35) आणि पंडित महादेव रेवे (वय 30, दोघे रा. औराद, ता. दक्षिण सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. सरकारच्या वतीने अँड. व्ही. एन. देशपांडे तर आरोपीच्या वतीने अँड. विक्रांत फताटे यांनी काम पाहिले.
तांब्याच्या पाइपची चोरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील इंदिरा गांधी स्टेडियम येथील रेड अँण्ड टेलर या दुकानच्या बाहेरच्या बाजूस असलेली तांब्याची पाइप चोरट्यांनी चोरून नेली. त्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये इतकी आहे. ही चोरी गुरुवारी पहाटे निदश्रनास आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुजित विश्वनाथ अडुणगी (वय 47, रा. वीरशैवनगर, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली.

नशेत पेटवून घेतल्याने मृत्यू
राहत्या घरात दारूच्या नशेत बुधवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने शशिकांत सद्गुरू माने (वय 45, रा. कुमठेगाव, सोलापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी मरण पावले. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे.