आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील चौघे संशयित वर्षांनी पोलिसात हजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आमच्यापरिसरातून ये-जा का करतो या कारणावरून दीपक सोपान साबळे (वय २६, रा. राजीव गांधीनगर भवानीपेठ) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी गायब असलेले चौघेजण पोलिस ठाण्यात हजर झाले. गणेश जाधव (वय ३१), राजू सुरवसे (वय २६), जानेश्वर सिरसट (वय २५), गोपाळ माने (वय ३२, रा. सर्वजण मराठावस्ती) यांना सोमवारी न्यायाधीश एस. एस. पानसरे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर २८ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी मिळाली. ही घटना जून २००९ रोजी भवानीपेठ परिसरात घडली होती. रोहित साबळे याने जेल रोड पोलिसात फिर्याद दिली होती. एकूण अकरा आरोपी होते. अनंत जाधवसह दोघांना यापूर्वीच शिक्षा झाली आहे. पाचजण निर्दोष सुटले होते. सरकारतर्फे अॅड सार्थक चिवरी, आरोपीतर्फे विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन तिवटे तपास करीत आहेत.