आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून करून पसार झालेल्या ऑर्केस्ट्रा गायिकेस प्रियकरासह अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुळेगाव रस्त्यावरील रार्जशी बारमध्ये संगीत ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात गायक म्हणून काम करणार्‍या विवाहिताने एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळवले. त्याला विरोध करणार्‍या पतीचा गुप्तीने वार करून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना सोलापूर तालुका पोलिसांनी मंगळवारी दौंडमध्ये अटक केली आहे.

रिना ऊर्फ किरण व्हीक्टर इमिलीयस (वय 25), तिचा प्रियकर उस्मान मलिकसाब बागवान (वय 35, रा. गाणगापूर, ता. आळंद, गुलबर्गा) या दोघांना अटक झाली आहे. व्हीक्टर मॉर्गन इमिलीयस या तरुणाचा खून झाला होता. मुळेगाव- हैदराबाद रस्त्यावरील राजश्री बारमध्ये रिना गायक म्हणून काम करीत होती. तिचा प्रियकर उस्मान त्याच हॉटेलात अधून-मधून येत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंधाचे सूत जमले. त्यांच्या प्रेमात पती व्हीक्टर अडचणीचा ठरला होता. त्यामुळे रिनाने प्रियकर उस्मान व त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीचा काटा काढला.

दौंडमार्गे कोलकात्याला : घटनेनंतर किरण दोन मुलांसह उस्मानसोबत गायब होती. पोलिस मात्र गाणगापुरात तपासासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर ते पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पुण्याहून ते कोलकात्याकडे रेल्वेतून जात होते. दरम्यान दौंड रेल्वे स्टेशनवर त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. दोघा संशयितांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. हा गुन्हा पोलिस उपअधीक्षक मनीषा दुबुले, निरीक्षक शिवप्रसाद यादव, साहाय्यक फौजदार घोळवे, हवालदार नीलकंठ जाधवर, शिरीषकुमार सोनवणे, प्रकाश कारटकर, संतोष देवकर, दयानंद हेबाडे या पथकाने उघडकीस आणला.