आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Director Anand Modak ,Latest News In Divya Marathi

संगीताचा हसरा आनंद हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महानिर्वाण, पडघम, कळत नकळत, या गाजलेल्या नाटकांचे तर चौकट राजा, मसाला डँबीस, समांतर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, दोहा, दिवसेंदिवस नातीगोती या दर्जेदार चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचे पुण्यात हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीतातील हसरा आनंद हरपला आहे, अशा प्रतिक्रिया सोलापूरच्या संगीतकारांनी व्यक्त केल्या.
शब्दांना महत्त्व देणारे
गीतकाराने कोणत्याही प्रकारचे गीत दिले तरी त्यांना कसे बोलके करायचे याची गम्मत त्यांना कळत असे. त्यामुळे त्यांनी शब्द बद्ध केलेल्या प्रत्येक गीताला संगीत देताना शब्दांना महत्त्व दिलं. नागेश भोसेकर - ढोलकी वादक
अभिरूचीचे जाणते संगीतकार
रसिकांना नेमके कोणते सूर, कोणते शब्द आवडतात याचा योग्य अंदाज त्यांना होता. त्यांच्या प्रत्येक गीतात वेगळेपण आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांना संगीत देऊन नव्या वादक गायक कलावंताना संधी दिली होती. त्यांच्या या गुणांनी ते नवख्याचे लाडके होते. त्यांच्यातील रसिकांना हव्या त्या अभिरुची देण्याचे जिज्ञासूपणाने दरवेळी नवनिर्मिती होत असे.
ओंकार सूयवंशी, तबलावादक
आनंद देणारा संगीतकार
आपल्या गीतांच्या ओळींनी ज्यांनी नेहमीच आनंद दिला असे ते संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चौकट राजा या चित्नपटातील गीत हे अजरामर तर महानिर्वाण नाटकाच्या रूपाने मराठी नाटय संगीत सृष्टीला नवा आयाम दिला होता. त्यांच्या गीताची शैली ही संगीतासह शब्दांना महत्व देणे अशी होती. ते शब्द आणि संगीत पोरके झाले. 0 डॉ. राजीव माहोळकर - गायक
नवे प्रयोग करणारे संगीतकार
अनेक चित्रपटात युगुल गीते बनली आहेत. मोडकांनी आपल्या विदूषक चित्रपटात युगुल लावणी बांधली होती. त्यांच्या या गीताने त्यांच्यात लपलेला अनोखा संगीतकार बाहेर डोकावला होता. त्यांनी आापल्या चौकट राजा या चित्रपटासही उत्तम असे संगीत दिले होते. एक झोका हे गीत गुणगुणण्याचा मोह आवरत नाही.

गोडवा त्यांचा स्थायीभाव
आपल्या संगीतात गीतात त्यांनी नेहमीच गोडवा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विदूषक चित्रपटातील सर्वच गीतांची मोहिनी आजही रसिकांच्या मनावर आहे. त्यांनी संगीताचे विविध प्रयोग मराठी चित्रसृष्टीत केले. त्यांच्या गीतांचे स्मरण अखंडित राहील. संदीप कुलकर्णी - संगीत शिक्षक