आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Theater Stage, Latest News In Divya Marathi

पद्माकर देव हे महाराष्ट्राचे भूषण, साखळकर यांचे प्रतिपादन,देव पुरस्काराने झाला गौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरातील संगीत नाट्य रंगभूमीचे पद्माकर देव सर संवर्धक होते. ते केवळ सोलापूरचे नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण होते, असे मत बालगंधर्व नाट्य रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर (पुणे) यांनी व्यक्त केले.
श्रुती मंदिर संस्थेच्या पद्माकर देव स्मृती पुरस्काराचे वितरण रविवारी झाले. त्यात पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
साखळकर पुढे म्हणाले की, आज संगीत नाटक हे संकटात अडकले आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी नव्या पिढीने पुढे येणे गरजेचे आहे. नाट्य संगीताचा प्रवास करणाऱ्या योग्याच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाल्याने मी खूप आनंदी आहे हा पुरस्कार मी माझे दैवत पु. ल. देशपांडे यांना अर्पण करतो. यावेळी पिशवीकर यांनी आज कला क्षेत्रात सेवा करणा-या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात, हे काैतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
मंचावर ज्येष्ठ गायिका सुलभा पिशवीकर, प्रा. विद्या काळे, अॅड. जे. जे. कुलकर्णी उपस्थित होते. साखळकर यांना पिशवीकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी पुण्याचे रवींद्र कुलकर्णी यांचा नाटकातील किस्से गीत गायनाचा कार्यक्रम सादर झाला. तबल्याची साथ नितीन दिवाकर यांनी केली. प्रास्तािवक कुलकर्णी यांनी केले. शर्वरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
बालगंधर्वांना दिशा ...
नटवर्यबालगंधर्व हे सोलापुरात खूपवेळा यायचे. त्यांच्यावर सोलापूरच्या रसिकांनी खूप प्रेम केले. बालगंधर्वांना काही व्यसने होती. त्यात एक व्यसन होते ते उंची मद्य पिण्याचे. ते सोलापूरला आले होते तेव्हा त्यांच्यावर अतूट प्रेम करणारे सोलापूरचे एक शेठजी त्यांना भेटावयास गेले होते. त्यावेळी बालगंधर्वांच्या हातात मद्याचा पेला होता. ते पाहून शेठजींनी तुम्ही हे घेऊ नका, तुम्ही तार सप्तकात गाता. तेव्हा त्यांच्यावर यामुळे परिणाम होत असल्याचे जाणवते, असे सांगितले. त्या क्षणी नटवर्यांनी आपल्या हातातील मद्याचा पेला कायमचा टाकला तो शेवटपर्यंत. त्यामुळे सोलापूरच्या मातीत संगीताचे प्रेम आहे, असा किस्सा साखळकर यांनी यावेळी सांगितला.