आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Maratha Reservation Issue At Solapur, Divya Marthi

मुस्लिम, मराठा जात प्रमाणपत्रे वेळेत मिळावीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्याचा आदेश मिळाला असला तरी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्य़ा मागास प्रवर्गाचे (ईएसबीएस) दाखले देण्यातील प्रशासकीय गती किती असेल यावर प्रवेशाच्या लाभाचे गणित अवलंबून असेल. जात दाखल्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रे काढायची आहेत. अभियांत्रिकी द्वितीय वर्ष प्रवेश अंतिम मुदत 26 जुलै तर पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश अंतिम मुदत 30 जुलै आहे. प्रशासनाने गतिशीलता दाखवणे गरजेचे आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने निर्णय घेतला. जात प्रमाणपत्रे वितरण सुरू झाले, परंतु प्रवेशा संदर्भातील व शिष्यवृत्ती संदर्भातील लाभाबाबत अंमलाची माहिती अजूनही सामाजिक न्याय विभागाकडे आलेली नाही. फ्रीशिप अथवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असेल तर व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेता येऊ शकतो. यासाठी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने दाखले मिळणे अपेक्षित आहे. शासनाने 15 जुलै रोजी आरक्षण संदर्भातील परिपत्रक काढले आहे.
शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल
दहावी, बारावीसह विविध शाखांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरी विद्यार्थ्यांना फ्रीशिप शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. व्यावसायिक अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळाला तर लाभ मिळेल का हे समजले नाही. बी. डी. खुरगावकर, वालचंद महाविद्यालय

79 दाखले वितरित
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात दाखल्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा जात पुरावा बंधनकारक केला आहे. दाखल्यांवर ईएसबीसी (शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ) - 149 असा उल्लेख असेल. मुस्लिम लाभार्थ्यास विशेष मागास प्रवर्ग - अ (एसबीसी-ए) असा उल्लेख असेल. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी व प्रवेशास सवलत मिळण्यास लाभ होईल. गुरुवारी माळशिरस 50, बाश्री नऊ, दक्षिण 12, उत्तर तहसीलमधून आठ मराठा दाखल्यांचे वितरण केल्याचे कळाले.

संबंधितांना दाखले देण्याचे आदेश
शासनाचे आदेश आल्यानंतर तत्काळ सेतू कार्यालय व संबंधित प्रांतांना मराठा व मुस्लिम समाजातील शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्य़ा मागास विद्यार्थ्यांना दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करून दाखले दिले जातील. विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी

विद्यार्थ्यांना दाखला देण्याचे प्रांताधिकार्‍यांना अधिकार
मराठा, मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना दाखला देण्याचे अधिकार संबंधित प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. सेतू कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज उपलब्ध आहेत. शासकीय दस्तऐवज (सात-बारा उतारा, फेरफार उतारा, घराचा उतारा), शाळेचा दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स, प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला जोडावे लागणार आहेत