आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी दुभाजकाला धडकून तरुण ठार, पुणे रस्त्यावरील केगावजवळ झाला अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कोंडीहूनसोलापूरकडे येताना केगावजवळील अविराज हॉटेलजवळ दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला घडला.
मुस्तफा मेहबूबपाशा पिरजादे (वय २५, रा. राहुल गांधी झोपडपट्टी) या तरुणाचा मृत्यू झाला. इम्रान बंदेनवाज नदाफ (वय १९), इस्माईल शौकत सय्यद (वय २०, रा. दोघे राहुल गांधी झोपडपट्टी) हे जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेजण दुचाकीवरून कोंडी येथे काही कामासाठी गेले होते. धडकल्यानंतर मुस्तफा बाजूला उडून पडला. काही अंतरावर दुचाकी फरफटत गेली. तिघांना उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुस्तफा याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, तीन बहिणी असा परिवार आहे. तो विजापूर वेस पसिरातील एका हॉटेलात वस्तादचे काम करत होता. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद आहे.
कर्ता होता मुस्तफा
मुस्तफाच्यावडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. आई आणि तीन बहिणी असा परिवार. विडी कामगार असलेली आई विड्या वळून आलेल्या मजुरीवर संसाराचा गाडा ओढत होती. त्यात वयाच्या बारा वर्षांपासून मुस्तफा काम करत आईला साथ देत होता. कसेबसे दोघा बहिणींचे विवाह झाले. तिस-या बहिणीचे शिक्षण सुरू ठेवले. तो लक्ष्मी मार्केट परिसरातील कोहिनूर हॉटेल येथे खानसामा होता. कामात तो परिपक्व होता. त्यासाठी त्याला पगारही चांगला मिळायचा. हसतमुख असल्यामुळे तेथे सर्वांची मने जिंकली होती. अशा स्थितीत पंचविशीत असलेला मुस्तफा गेला. अपघात झाला त्यावेळी धाकटी बहीण घरी होती तर आई विजापूरला गेली होती. नातेवाईक मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. आई आणि मोठ्या बहिणींना अपघाताची माहिती देत बोलावण्यात आले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर त्यांना मुस्तफा गेल्याचे कळाले आणि त्यांनी हंबरडा फोडला.