आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या मायग्रेट इनकम कंपनीने सोलापूरमधील पाच जणांना गंडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मायग्रेट इनकम कंपनीत पैसे गुंतवा, महिन्यात दामदुप्पट पैसे देऊ अशी बतावणी करत सोलापुरातील एका महिलेसह पाच जणांना साडेबारा लाखाला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला. तृप्ती राजगोपाळ चंडक (रा. विश्वकर्ण पार्क, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली.

पंचवीस फेब्रुवारी २०१० पासून हा प्रकार सुरू होता. गणेश कैकाडी, रामचंद्र कैकाडी, सौ. रून्दा कैकाडी, सुषमा गणेश कैकाडी, गोपाळ सोमकुचरे, उचकल (पूर्ण नाव नाही- रा. सर्वजण नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीमती चंडक यांना एके दिवशी फोन आला. आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, दुप्पट पैसे देऊ असे आमिष दाखविले. कंपनीने आजपर्यंत पैसे देता साडेबाराला लाखाचा गंडा घातला. नेमकी फसवणूक कशी झाली याची माहिती घेऊ, असे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण साळुंखे यांनी सांगितले.