आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वर विद्यापीठ नामांतर कृती समितीच्या वतीने सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव द्यावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीचे आनंद मुस्तारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या मोहिमेअंतर्गत 1 लाख 1 हजार आठ जणांच्या स्वाक्ष-या घेण्यात येतील. तसेच निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना या सह्यांचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. 9 आॅगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता मान्यवर लोकांच्या हस्ते सिद्धेश्वर मंदिरात स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात येईल. 25 आॅगस्टपर्यंत ही मोहीम राबविली जाईल. या कार्यक्रमात सर्वपक्षीय व सर्वधर्मिय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस बिपीन धुम्मा, जयराज नागणसुरे, विजयकुमार हत्तुरे, मल्लिनाथ साखरे, गिरीश तंबाके, ऋषिकेश आकतनाळ, सोमनाथ मेंडके, राजेश सुतार, सिद्धाराम यलशेट्टी आदी उपस्थित होते.